आरोग्य

रात्रीच्या वेळी या पदार्थांचं सेवन केलं तर द्यावे लागेल या समस्यांना तोंड; वाचा सविस्तर!

चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे. कारण आहार चांगला असेल तरच आपण शारिरीकदृष्या मजबूत आणि तंदरूस्त राहतो. फक्त तो आहार वेळेवर घेणं महत्वाचं आहे. परंतू रात्री झोपण्या अगोदर काही पदार्थ आहेत त्यांचं सेवण करू नये. कारण त्याचा परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे नक्की कोणते पदार्थ आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

रात्रीच्या जेवणाचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे रात्रीचं जेवण हे चांगल्या आणि उत्तम दर्जाचं असावं. रात्रीच्या वेळेचं जेवण व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम आपल्या झोपेवरही होतो. आयुर्वेदात तर असं सांगितलं आहे की रात्रीचं जेवण हे झोपण्याआधी कमीत कमी दोन किंवा अडीच तास आधी करावं.

रात्री जेवणामध्ये नूडल्स खावू नका कारण नूडल्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. नूडल्स हे खूप लवकर तयार होतात. कारण ते आधीच तयार केलेले असतात. आपल्याला फक्त ते मसाला लावून त्यात शाकाहारी किंवा मांसाहारीप्रमाणे ते बनवून देतात.

शेजवान नूडल्स | Schezwan Noodles Recipe | Indian ...

नूडल्समध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते. जे चरबीमध्ये त्याचे रूपांतर होतं. त्यामुळे वजनही वाढतं. त्यासोबत नूडल्समुळे आपल्याला पोटाचे विकार उद्भावण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री नूडल्स खाणं टाळावं.

जर तुम्हाला रात्री भूक लागली असेल तर चिप्सच्या पाकिटातून त्वरीत सुटका करणे सर्वात सोपा आहे परंतु चिप्स खाणे जितके सोपे आहे तितकेच रात्री त्यांना पचविणे जितके कठीण आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नात मोठ्या प्रमाणात ग्लूटामेट असते ज्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री चिप्स खाणं टाळायला हवं.

रात्री जेवण झाल्यावर मिठाई खाई नये. कारण मिठाई ही खाव्याची बनवलेली असते. खावा हा आपल्या शरीरीला पचनशक्तीला पचवण्यासाठी जड जातो. त्यामुळे आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री मिठाई खाऊ नका.

Here's the hierarchy of mithai gifting - Times of India

झोपायच्या आधी मिठाई खाल्यामुळे आपलं वजन वाढणं, पोट वाढणं या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे मिठाई खाणं महाग महाग पडू शकतं.

पास्ता हा पदार्थ खूप लवकर तयार होतो. दिवसभर कंटाळलेले लोक झोपेच्या आधी ते लवकर तयार होते म्हणून त्याचे सेवन करतात. त्यात कार्बोहायड्रेट्स आणि इतर बरेच पदार्थ आहेत जे शरीर लवकर पचवू शकत नाहीत. रात्री उशिरा कोणी पास्ता खाल्ल्यास त्याला बद्धकोष्ठता आणि हायपर ऍसिडिटी सारखी समस्या उद्भवू शकते.

Pasta With Burst Cherry Tomatoes and XO Sauce Recipe | Serious Eats

झोपेच्या आधी चॉकलेट खाण्याची अनेकांना सवय असते. पण याव्यतिरिक्त, डार्क चॉकलेटमध्ये थियोब्रोमाइन नावाचे उत्तेजक घटक आहेत. यामुळे तुमच्या हृदयाचा ठोका देखील वाढतो.

दरम्यान, शक्यतो असे पदार्थ ग्रामीण भागातील लोक खात नाहीत शहरात मात्र सर्रास लोक या पदार्थांचं सेवण करतात. गावाकडील चटणी-भाकर ही सर्वात महत्वाची उत्कृष्ठ.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here