आरोग्यलाईफस्टाईल

जमिनीवर बसून जेवण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

आधुनिकरणाच्या या जमान्यात जमिनीवर बसून जेवणाची जागा आता ‘इम्पोर्टेड डायनिंग टेबल’नी घेतली आहे. अनेकांच्या घरात डायनिंग डेबल स्थिरावला आहे. लाईफस्टाईलच्या बदलामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जमिनीवर बसून जेवण कऱण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते.

जमिनीवर बसून जेवण्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदत होते.

2. मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरात होणारा रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते.

3. शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते.

4. बऱ्याच वेळा मोठे लोक जमिनीवर बसून जेवण करण्याचा सल्ला देतात. मेंदू आणि मन जेवणावर केंद्रित झाल्यामुळे तुमच्या शरीराची योग्य पद्धतीने वाढ होते.

5. गुढघे दुखीची समस्या दूर होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात.

6. जमिनीवर वाकून खाली बसताना तुमचा श्वास मंद होतो आणि पुन्हा जमिनीवरून उठताना  श्वासाचा वेग वाढतो. या प्रक्रियेमध्ये तुमच्या रक्तदाबावर चांगले नियंत्रण राहते आणि रक्तप्रवाह सुधारतो. म्हणूनच जर तुम्हाला सतत अती रक्तदाब अथवा कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल तर जमिनीवर बसून जेवण्याची सवय लावा.

7. जमिनीवर बसण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जमिनीवर बसण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुधारते.  ह्रदय मजबूत असेल तर अनेक आरोग्य समस्या आपोआप कमी होतात. यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते.

8. भरभर खाण्यामुळे अती कॅलरीज घेतल्या जातात. मात्र खाली बसल्यामुळे आपण भुक भागेल एवढंच जेवतो. शरीरात कमी कॅलरीज गेल्यामुळे आणि उठबस केल्यामुळे योग्य व्यायाम झाल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. शिवाय खाली बसण्याच्या सवयीमुळे पोटावर योग्य दाब पडतो आणि  बेली फॅटदेखील कमी होते.

9. जमिनीवर वाकणे, बसणे आणि पुन्हा उठणे या प्रकारात शारीरिक हालचाल झाल्यामुळे अपचन होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार अपचन, बद्धकोष्ठता अथवा मुळव्याध अशा समस्या असतील तर जमिनीवर बसून जेवणाचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

10. जमिनीवर बसण्याच्या सवयीमुळे तुम्हाला पाठीचा त्रास होत नाही. कारण जेवणासाठी जमिनीवर बसताना तुमच्या पाठीचा कठा ताण राहतो. पाठीच्या कण्यावर यामुळे चांगला ताण येतो. यामुळे तुमच्या शरीराला योग्य व्यायाम मिळेल आणि तुमची पाठदुखी कमी होऊ लागेल.

Comment here