आरोग्यलाईफस्टाईल

जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे

दिवसभरातून 3 – 4 लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे. शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत चालावी यासाठी शरीराला आहारासोबतच पाण्याचीदेखील तितकीच गरज असते. आरोग्यासाठी कोमट पाणी लाभदायक आहे. दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येतं. गार पाणी पिण्यापेक्षा गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

1. कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे कफ आणि सर्दी लवकर दूर होतात.

2. भूक कमी लागण्याची समस्या दूर होते.

3. मासिक पाळीत बहुतांश महिलांना त्रास होतो. कोमट पाण्यामुळे या दुखण्यापासून मुक्तता मिळवणं शक्य आहे. यादरम्यान कोमट पाण्यानं पोट शेकल्यास मोठा दिलासा मिळतो.

4. दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.

5. पचनक्रिया सुधारते.

6.  ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

7. घसा दुखत असल्यास आराम मिळतो.

8. कोमट पाणी पिणं केस आणि त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. केस चमकादार होऊन त्यांची वाढही होते.

9. सकाळी कोमट पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.

10. अधून मधून पाणी पिल्यानं शरिरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.

Comment here