मनोरंजन

जाणून घ्या मनुके खाण्याचे फायदे

आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. सतत औषधं घेण्याऐवजी काही विशिष्ट पदार्थांचं सेवन करणं लाभदायक ठरू शकतं. यात तुम्हाला बेदाणे म्हणजेच मनुका फायदेशीर ठरू शकतात. मनुके खाण्यास जेवढे स्वादिष्ट आहेत, तेवढेच अन्य ड्रायफ्रूटच्या तुलनेत स्वस्त देखील आहेत. मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत.

1. मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. यातील पोषकघटकांमुळे रक्ताच्या समस्या कमी होतात. तसंच शरीराला अधिकाधिक फायबर मिळते.

2. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

3. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव होत. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग देखील निखरण्यास मदत होते.

4. मनुक्यातील नैसर्गिक साखर तुमच्या शरीराला नुकसान पोहचवत नाही. यामुळे याचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन देखील कमी होते.

5. ज्यांना जंक फूड खायची सवय असेल त्यांच्या त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. पण, जर आहारात मनुकांचं सेवन केलं तर त्वचेचा पोत आणि तिचं आरोग्यं सुधारतं आणि तिची चमक दीर्घकाळ टिकते.

6. मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

7. मनुक्याचे सेवन केल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होऊन हेयर फॉलची समस्या देखील दूर होते.

8.  मनुक्यात नैसर्गिक साखर असते, जी सहज पचते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. मनुक्यात कोलेस्ट्रॉल नसतो, ज्यामुळे ह्रदयाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे चांगले आहे.

9. शरीरातील अवयवांना मजबूत करण्यासाठी मनुका उपयुक्त असतात. मनुक्यात असणारं कॅचेटिन नावाचं द्रव्य आपल्या शरीराच्या अवयवांना मजबूत ठेवण्यात मदत करतं.

10. दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.

Comment here