आरोग्यखाद्यसंस्कृतीलाईफस्टाईल

शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ 10 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आरोग्य चांगले आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी गुळ आणि शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. शेंगदाण्यामध्ये काजू प्रमाणे आरोग्यासाठी चांगले गुण आढळून येतात. त्यामुळे आपल्या आहारात तेलयुक्त बिया, शेंगदाणे असे स्निग्धांश असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. शेंगदाण्याला प्रोटीनसाठीचं सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानलं जातं. यासाठीच जाणून घेऊया शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे –  

1. शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात.

2. जीवनसत्व बी 3 चा स्त्रोत असलेले शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मुठभर शेंगदाणे खाण्यास काही हरकत नाही.

3. शेंगदाण्यात अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतं. ज्यामुळे शेंगदाणे नियमित खाण्यामुळे पोटाचे आजार आणि आतड्यांचा  कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. शेंगदाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

4. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे याच्या सेवनाने त्वचा नेहमी तरुण दिसते.

5. शेंगदाण्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. रक्तदाबाचा त्रास असेल तर नियमित शेंगदाणे जरूर खा.

6. जेवण झाल्यानंतर 50 किंवा 100 ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते, अन्न पचते आणि रक्ताची कमतरता भासत नाही.

7. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते. हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.

8. फार कमी लोकांना हे माहीत असेल की शेंगदाणे खाण्यामुळे तुमचा सर्दी – खोकल्यापासून बचाव होऊ शकतो. हिवाळ्यात शेंगदाणे खाण्यामुळे तुमच्या शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते. शिवाय शेंगदाणे तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.

9. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत  असाल तर शेंगदाणे खाणे तुमच्या फायद्याचे आहे. कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुमचे पोट साफ राहते आणि तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

10. आठवड्यातून 5 दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो.

Comment here