आरोग्यलाईफस्टाईल

जाणून घ्या गुळाचे निरोगी आरोग्यासाठी होणारे फायदे

गुळ हा सर्व स्वयंपाक घरात अवश्य आढळतो. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि कडक गुळ या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते. गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो, पण हे झालं फक्त सणवारापुरत. एरव्ही मात्र गुळाचा तितकासा वापर होताना दिसून येत नाही. पण गुळाचा आहारात समावेश असायला हवाच कारण फक्त गोडवा वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठीदेखील गूळ फायदेशीर आहे.

गुळाचे आरोग्यदायी फायदे –

1. गुळ हे एक नैसर्गिक शरीर क्लीन्जर आहे आणि यकृतचे कार्यभार कमी करते. गूळ शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकून यकृत शुद्ध करण्यास मदत करते.

2. गुळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळ जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते.

3. गूळ खाल्ल्यानं रक्तातील ग्लुकोज सावकाश वाढतं. त्यामुळे दीर्घकाळापर्यंत शरीराला ऊर्जेचा पुरवठा होतो.

4. थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो.

5. गुळ, अनेक आवश्यक पोषक द्रव्यांमधून विशिष्ट पदार्थ आहे, मासिक पाळीच्या समस्यांसाठी एक प्रभावी नैसर्गिक उपचार आहे.

6. गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. दुध आणि गुळ हे एकत्रित हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे.

7. गूळ श्वसननलिका, फुफ्फुस, पोट आणि आतडे यांतील अशुद्धींना बाहेर काढतो.

8.  गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र रक्त दूषित होऊन अंगावर फोड येण्याचा धोका असतो. म्हणून ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गूळ खाऊ नये.

9. गुळामध्ये जस्त आणि सेलेनियम सारख्या अँटिऑक्सिडंट्स आणि खनिज पदार्थांनी भरलेले असते, जेणेकरून मुक्त-मूलभूत नुकसान टाळण्यास मदत होते आणि संक्रमणाविरूद्ध प्रतिकार करण्यास मदत होते.

10. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.

Comment here