आरोग्यलाईफस्टाईल

जाणून घ्या सकाळी कोमट पाण्यात हळद मिसळून पिण्याचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्‍यक असतेच. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी अथवा साधे पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देतात आणि ही एक चांगली सवयही आहे. परंतु, जर या पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून सेवन केले तर तर त्याचे अनेक गुणकारी फायदे पाहायला मिळतील.

सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा अनेक लहान समस्या असतात. परंतु, काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर या समस्या नक्कीच दूर होतील. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत हळद फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. दुधातून हळद घेण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित आहे. मात्र हळद गरम पाण्यातून सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

हळद घालून कोमट पाणी पिण्याचे फायदे – 

1. हळदीचे पाणी पिण्यामुळे जेवण सहज पचनण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही. हळदीमध्ये करक्‍युमिन असल्याने हे एक अँटीऑक्‍सींडेंट आहे. यामुळे कर्करोगाशी लढा देण्यास मदत करते.
2.  प्रतिकारशक्ती वाढते – हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते.
3. चेहरा उजळण्यास मदत – हळद त्वचेसाठी वरदान मानले जाते. जर तुम्ही याचे सेवन केलेत तर तुमच्या त्वचेचा रंग उजळतो. हळदीमध्ये रक्त स्वच्छ करणारे घटक असतात. हळदीमुळे त्वचेमधील विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. यामुळे त्वचा साफ, स्वच्छ आणि उजळ होते.
4.  घसा खवखवत असल्यास आराम मिळतो –  अनेक वेळा सर्दी होण्यापूर्वी घसा खवखवतो किंवा दुखतो अशा वेळी चिमुटभर हळद घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास घशाला शेक मिळतो आणि त्रास कमी होतो.
5.  साखरेची पातळी नियंत्रणात – हळदीमुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद प्यायल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
6.  अन्नपचन होते – हळदीमुळे पित्ताशयामध्ये पित्तरस निर्माण होण्यास मदत होते. पित्तरसामुळे पचनशक्ती चांगली होते. यामुळे पाचनक्रिया सुरळीत राहते. जर तुम्ही खूप जंक फूड खात असाल तर तुम्हाला दररोज हळदीच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

Comment here