आरोग्यलाईफस्टाईल

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहित आहे का?

नारळ हा आपल्या दैनंदिन आहारातला महत्वपूर्ण घटक आहे. नारळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरायला सर्वात चांगले आणि सुरक्षित मानले जाते. तसेच सकाळी व्यायाम झाल्यानंतर नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते त्यामुळे बहुतांश लोक सकाळी उठल्यावर नारळ पाणी पितात. नारळ पाणी पिण्याचे भरपूर आरोग्यादायी फायदे आहेत.

नारळ पाणी पिण्याचे आरोग्यादायी फायदे –  

1. नारळ पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम सारखे पोषक तत्त्व असून हे एंटीऑक्सीडेंट आहे.

2. हंगामी परिणामामुळे किंवा चुकीचे खाण्यामुळे होणाऱ्या पोटदुखीमध्ये नारळपाणी प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.

3. नारळ पाणी किडनी स्टोनवर उपाय म्हणून नियमित पिणे फायदेशीर ठरते. आपल्या शरीराचा रक्त पुरवठा नियमित आणि संतुलित ठेवण्याचे काम नारळ पाणी करते.

4. निर्जलीकरण (डिहाइड्रेशन) आणि उलट्यांचा त्रास झाल्यास नारळाच्या पाण्यात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

5. उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी नारळ पाणी उपयुक्त आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना रोज एक ग्लास नारळ पाणी प्यायला हवं.

6. आपल्या वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्याचे काम नारळ पाणी करते.

7. नारळ पाणी पिण्याने चेहर्‍यावरील पिंपल्स, पुरळ आणि डाग दूर होतात. याचे सेवन केल्याने त्वचा नितळ बनते. या व्यतिरिक्त केसांसाठी हे उत्तम कंडिशनरचे काम करतं. याने केस लांब, मुलायम आणि चमकदार होतात.

8. उन्हाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने घसा बऱ्याच काळ ओला राहतो आणि आपल्याला तहान लागत नाही.

9. नियमित नारळ पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

10. नारळ पाणी मधुमेहावर नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

11. नारळ पाण्याला दररोज आपल्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरूम आणि त्यापासून होणारे डाग बरे होतात.

Comment here