आरोग्यलाईफस्टाईल

जाणून घ्या, ताक पिण्याचे खास फायदे

प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. ताकामध्ये सर्व प्रकारच्या पौष्टिक गुणधर्म असतात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे. दुग्धजन्य पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ताक. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत.

ताक पिण्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. ताकामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पाणी  असते ज्यामुळे तुम्हाला त्वरीत उर्जा मिळते. यासाठी अशक्तपणा अथवा थकवा दूर करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते.

2. ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या कधीच येत नाही.

3. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

4. ताक पिण्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुमचा रक्तदाबदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित असल्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते.

5. ताकमध्ये विटामिन सी, ए, ई, के आणि बी असतं. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं.

6. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होण्यास मदत होते.

7. लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2-3 वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

8. ताकामध्ये ओवा टाकून प्यायल्याने कफची समस्या बरी होते.

9. ताक पोटातील दाह कमी करून शीतलता प्रदान करते.

10. ताकामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज जेवणाच्या मधल्यावेळात भुक लागल्यावर ताक प्या. यामुळे तुमची भुक तर भागेलच शिवाय तुमचे वजनदेखील वाढणार नाही.

Comment here