आरोग्यलाईफस्टाईल

‘ब्लॅक टी’चे असेही आरोग्यदायी फायदे

आपल्या दिवसाची सुरूवात ही चहानं होत असते. चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दूधाच्या चहाच्या तुलनेत खूप कमी लोकांना ब्लॅक टी आवडते. तुलनेने ब्लॅक टी चवीला चांगली लागत नसली तरी त्याचे अनेक फायदे आहेत. ब्लॅक टी म्हणजे काळा चहा.

ब्लॅक टी चे आरोग्यदायी फायदे –  

1. ब्लॅक टी हा आपल्या हृदयाला फार गुणकारी असतो. हा चहा प्याल्याने आपले हृदय निरोगी आणि बळकट रहाते.

2. सकाळच्यावेळी काळा चहा हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे.

3. दररोज दोन ते तीन कप ब्लॅक टी प्राशन करण्याने आपण प्रोस्ट्रेट, फुफ्फुस आणि किडनी यांच्या कर्करोगापासून मुक्त राहू शकतो. मेंदूच्या पेशींनाही हा चहा प्रेरणा देतो.

4. ब्लॅक टीमुळे वजन घटवण्यास मदत होते. तसंच शरीरातील टॉक्सिंस, विषारी घटक बाहेर निघण्यास मदत होते. विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर निघाल्यामुळे कोणताही आजार बळावण्याची शक्यता कमी होते. टॉक्सिंस शरीरातून बाहेर पडल्यामुळे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते.

5. संशोधकांनी ब्लॅक टी आणि ग्रीन टीमध्ये प्रोबायोटिक्स तत्व आढळून येत असल्याचे सांगितले आहे. प्रोबायोटिक्स तत्व शरीरात प्रतिरोधक सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी मदत करतात. ब्लॅक टी वजन नियंत्रणात ठेऊन अनेक आजारांपासून बचावही करते.

6. काळ्या चहामध्ये असलेले टॅनिन पचना साठी खूप फायदेशीर असतं. गॅस व्यतिरिक्त हे पचनाशी निगडित इतर समस्यांमध्ये देखील खूप फायदेशीर असतं.

7. या चहामध्ये विशिष्ट घटकांमुळे तरतरी आणि उत्साह वाढते आणि त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते.

8. योग्य प्रमाणात काळा चहा प्यायल्याने मुतखड्यापासून बचाव होऊ शकतो.

9. नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

10.  ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर नसल्याने शरीरात फॅट जमा होत नाही. चहातील अॅन्टीऑक्सीडेंट शरीरातील अतिरिक्त चरबी न वाढू देण्याचे काम करते.

Comment here