आरोग्यलाईफस्टाईल

कारली कडू असली तरी शरीराला आरोग्यदायी.

कारले म्हटल्यावर अनेकजण नाकं मुरडतात. कारलं म्हटलं तरी तोंडात कडूपणा यायला लागतो. मात्र या कडू कारल्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

कारल्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.

2. कारले नियमित खाल्याने त्वचा चमकदार होते व काही स्किन इनफेक्‍शन असल्यास दूर होतात. कारल्यात रक्‍त शुद्ध करण्याचे गुणधर्म असल्याने ज्यांना पिंपल्सचा वारंवार त्रास होत असल्यास कारले खावे.

3. कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

4. कमी भूक लागत असल्यास कारल्याचे सेवन करा. भूक वाढीस मदत होते. भूक न लागल्यामुळे फारसे खाल्ले जात नाही. त्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. परिणामी स्वास्थ्यासंबंधिचे अनेक समस्या सुरू होतात. यावर कारल्याचा रस घेणे किंवा भाजी खाणे उपयुक्त ठरते.

5. दाद, खरुज, सोरॉसिस यांसारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रसात लिंबाचा रस घालून पिणे लाभदायी ठरते.

6. कारले शरीरातील टॉक्‍सिन्स कमी करते. वजन कमी करायाचे असल्यास कारल्याचा ज्युस रोज घ्यावा. कारले कडू असल्याने ज्युसमध्ये थोडे मध किंवा गुळ मिक्‍स करून प्यावा.

7. कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

8.  नियमित कारले खाल्याने बॉडी स्टॅमिना व एनर्जी वाढवते.

9. उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो.

10. कारल्याचा रस प्यायल्याने सोरायसिस किंवा काही फंगल इनफेक्‍शन असल्यास कमी होण्यास मदत करते.

Comment here