इतिहासट्रेंडिंग

राम जन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या कारसेवकाचं निधन

राममंदिराचा भूमिपूजन सोहळा असल्याने जेष्ठ कारसेवक आनंदातच होते. मात्र सत्कार सोहळ्यादरम्यानच त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली आहे. निधन झालेल्या कारसेवकाचं नाव बल्लूजी उर्फ लक्ष्मीकांत मोहरीलाल असं होतं.

बल्लूजी मोहरील राम जन्मभूमी आंदोलनात 1987 पासून जोडले गेले होते. मेहकर येथील श्रीराम मंदिरात रामजन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या 50 कारसेवकांचा सत्कार स्थानिक समितीने संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला होता. राम जन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या बल्लूजी मोहरील यांचा सत्कार झाला आणि ते खाली बसले. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली त्यांना इतर कार्यकर्त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.

बल्लूजी मोहरील यांचं वय 77 होते. बल्लूजी मोहरील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि सेवानिवृत्त शिक्षक होते. स्थानिक मे.ए. सो.हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय होऊन स्थानिक पातळी पासून ते उपजिल्हाध्यक्ष पदी विराजमान झाले होते.

1992 मध्ये अयोध्येवरून परत येत असताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे 8 दिवस तुरुंगवास भोगलेल्या लक्ष्मीकांत उर्फ बल्लूजी मोहरील यांनी आपला प्राण मेहकरातील बडा राम मंदिरातच सोडल्याची दुःखद घटना घडली.

Comment here