मनोरंजन

सुशांतच्या वडिलांकडेच त्याचा फोन नंबर नसायचा, अंकिता लोखंडेनं केला खुलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी रियाविरोधात गुन्हा आणि पैशाबाबत आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रतिक्रिया दिली आहे.

“सुशांत नैराश्यामध्ये जाणं शक्यच नाही. कारण त्याने अनेक मोठमोठ्या संकटांचा सामना करुन यश मिळवलं होतं. त्याच्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांकडे त्याचा नवा नंबर नव्हता. त्याच्या वडिलांनी एकदा मला फोन करुन सुशांतशी बोलणं होत नसल्याचं सांगितलं होतं. त्याची बहीण देखील तब्बल एक वर्षानंतर मे महिन्यात त्याच्यासोबत बोलली होती. सुशांत इतके दिवस आपल्या कुटुंबीयांशिवाय राहूच शकत नव्हता. रियाच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यासोबत नक्कीच काही तरी विचित्र घटना घडल्या आहेत.” असा अनुभव अंकिताने सांगितला.

सुशांतच्या स्वभात झालेल्या बदल त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आला होता. त्याची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्याची मोठी बहिण त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आली होती. मात्र, सुशांतनं त्यांना घरी येणार नाही असं सांगत त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. घरच्यांपासून तो दुरावला होता, असा खुलासा अंकितानं केला.

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना मुंबई पोलिसांना आधीच माहिती दिली होती, असा दावा केला आहे.“सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबईतील वांद्रे पोलिसांना 25 फेब्रुवारी रोजी याची माहिती दिली होती. सुशांत चुकीच्या लोकांच्या संगतीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ही माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा सुशांत पूर्णपणे रिया चक्रवर्तीच्या नियंत्रणाखाली गेलेला होता,” असं सिंह म्हणाले.

Comment here