मनोरंजन

अमिताभ, अभिषेक यांच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्याला ही झाली कोरोनाची लागन

 महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमिताभ, अभिषेक बच्चन यांच्यापाठोपाठ अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

पहिल्यांदा ऐश्वर्याचा आणि आराध्याचा प्राथमिक चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, दुपारी फायनल रिझल्ट मध्ये त्या दोघेही पाॅझिटिव्ह निघाल्या.

अमिताभ बच्चन यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदाही यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी मुंबई महापालिकेचे अधिकारी बच्चन यांच्या निवासस्थानी ‘जलसा’ बंगल्यावर दाखल झाले. ‘जलसा’ बंगला पूर्णपणे सॅनिटाईज करण्यात आला. याशिवाय अमिताभ यांचा ‘जलसा’ आणि ‘जानकी’ बंगला दररोज सॅनिटाईज केला जाणार आहे, अशी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

गृहमंत्री अनिल देशमुख “शहंशाह” कोरोनाची “दिवार” तोडून “अग्निपथावर” मात करतील आणि आपल्या सर्वांना आनंद देतील अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

Comment here