ट्रेंडिंग

“माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला, पण..”; रियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 29 दिवसानंतर बुधवारी जामीन मिळाला. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर ती या सगळ्या प्रकरणाचा सामना करत आहे. एनसीबी, सीबीआयच्या सात तासांच्या चौकशीचाही संयम बाळगत सामना केला. जामीन मिळाल्या नंतर तिची आई संध्या चक्रवर्ती यांनी पहिल्यांदाच तिच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुशांतच्या कुटुंबाने रियाच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चक्रवर्ती कुटुंबासाठी हा कठीण असा काळ. गेले काही महिने चक्रवर्ती कुटुंब कोणत्या परिस्थितीतून गेलं याबाबत रियाच्या आईने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या सर्व परिस्थितीमुळे आपल्याला आत्महत्या करावीशी वाटली असं त्यांनी सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संध्या चक्रवर्ती म्हणाल्या, “मुलं जेलमध्ये असल्याने माझी झोप उडाली होती. मी बेडवर शांतपणे झोपू शकत नव्हते, रात्रभर जागे असायचे. काहीच खावं-प्यावंसं वाटायचं नाही. रात्री मनात काय काय विचार यायचे आणि मी अचानक उठून बसायचे. यादरम्यान माझ्या मनात आत्महत्येसारखे विचारही आले. ज्यामुळे मला थेरेपी घ्यावी लागली. असे विचार आल्यानंतर मला माझ्या मुलांसाठी जगायचं आहे, म्हणून स्वतःला खंबीर बनवलं”

संध्या म्हणाल्या, “रिया घरी आल्यानंतर मला दिलासा मिळाला. मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. तिनं इतकं काही सहन केलं आहे तरी जेव्हा ती घरी आली तेव्हा म्हणाली, तू दुःखी का आहेस, आपल्याला मजबूत बनवून लढाई लढायची आहे. मात्र ती ज्या परिस्थितीतून गेली त्या भयंकर स्वप्नातून ती बाहेर कशी पडणार, याची चिंता आहे. रियाच्या डोक्यातून हे सर्व बाहेर काडण्यासाठी मला तिची थेरेपी करून घ्यावी लागेल”

एनसीबीनं ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्ती हिला जामीन मंजूर झाल्यानंतर जेलमधून बाहेर येणाऱ्या रियाची गाडी कोणीही फॉलो करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. असे केल्याच कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता.

Comment here