ट्रेंडिंगमनोरंजन

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मोठी घडामोड, ड्रग्स कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ड्रग्जचा मुद्दा समोर आला आहे. याबाबत गेले तीन दिवस सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु होती. मात्र आता मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली अटक केली आहे.

28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने 10 दिवसांत शौविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.

रियाची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. कोरोनाची तपासणी केली गेली, ती नकारात्मक आली. त्यानंतर रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रियाला ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

रियाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल. एनसीबीने रियाची रविवारी सहा तास आणि सोमवारी आठ तास चौकशी केली. यावेळी एनसीबीने रिचा धाकटा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांची समोरसमोर चौकशी केली.

रियाच्या अटकेनंतर माध्यमांना उद्देशून एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, रियाच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती देण्यात आली आहे. रियाला तिच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून मिळालेली माहिती आणि यापूर्वी अटक करण्यात आलेल्या लोकांच्या विधानांच्या आधारे अटक करण्यात आली आहे. रिया विरुद्ध एनसीबीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यानंतर आता रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला 14 दिवसांची, म्हणजेच 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comment here