मनोरंजन

‘अमिताभ रुग्णालयात, आता तू तुझं पोट कसं भरणार?’, अभिषेकने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. टि्वटरवर एका ट्रोलरने अभिषेकला ‘तुझे वडिल अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू तुझं पोट कसं भरणार?’ असा सवाल केला होता. त्यावर अभिषेकनं चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिषेकने ‘ब्रीद’ या त्याच्या वेब सीरीजबद्दल बुधवारी एक टि्वट केले होते. त्यावर एका ट्रोलरने कमेंट करताना अभिषेकची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. ‘तुझे वडील अमिताभ बच्चन रुग्णालयात आहेत. आता तू तुझं पोट कसं भरणार?’ असा सवाल केला. त्यावर अभिषेकने ‘सध्या तरी आम्ही दोघे रुग्णालयात झोपून खात आहोत’ असे उत्तर दिले.

त्यावर ट्रोलरने “गेट वेल सून सर…प्रत्येकाच्या नशिबात असे झोपून खाणे नसते” असे प्रत्युत्तर दिले. त्यावर अभिषेकने त्या ट्रोलरला चांगले जिव्हारी लागणारे उत्तर दिले. “आम्ही ज्या परिस्थितीतून गेलो, तशी वेळ तुझ्यावर येऊ नये, सुरक्षित आणि तंदुरुस्त राहा. तुमच्या शुभेच्छांसाठी आभारी आहे मॅडम” असे उत्तर अभिषेकने दिले.

अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यानंतर अमिताभ बच्चन सह अभिषेक बच्चन यांना सोशल मीडियावर चांगलेच युजर्सद्वारे ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावरून युजर्सद्वारे ट्रोल करण्यात आल्यावर बिग बी ने सुद्धा संताप व्यक्त केला होता.

Comment here