धार्मिक

…म्हणून सूर्यग्रहणानंतर भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्र तलावामध्ये केलं होतं स्नान; वाचा संपुर्ण कथा!

2020मध्ये दोन किंवा चार चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यापैकी 10जानेवारी आणि पाच जून रोजी दोन चंद्रग्रहण झाली आहेत. पहिलं सुर्यग्रहण होतं. याच महिन्यात 5 तारखरेला चंद्रग्रहण होतं. तर यंदाच्या वर्षीचं पहिलं सुर्यग्रहण आज 21 जूनला होतं. यंदाच्या सुर्यग्रहणाचं केंद्र हरियाणामधील कुरुक्षेत्र आहे. हे कुरुक्षेत्र महाभारत काळापासून प्रसिद्ध आहे. कुरूक्षेत्राचा सूर्यग्रहणाशी जुना संबंध काय आहे ते आपण कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

हरियाणाच्या कुरुक्षेत्रात मूर्ती नावाचा तलाव आहे. या तलावाची लांबी सुमारे 1800 फूट आणि रुंदी 1400 फूट आहे. असं म्हटलं जातं की तलावात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाप्रमाणे पुण्य मिळतं. त्यासोबतच असंही म्हणतात की सूर्यग्रहणानिमित्त ब्रह्मा सरोवर आणि निरंतर तलावामध्ये स्नान केल्याने मोक्ष मिळतो.

त्यामुळे सुर्यग्रहणाच्या वेळी सर्व देवलोक कुरुक्षेत्रावर उपस्थित असतात. त्यामुळेम्हणूनच या मान्यतेनुसार सूर्यग्रहणानिमित्त लाखो भाविक स्नान करण्यासाठी येथे येतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तलावात स्नान करण्यास बंदी लावण्यात आली आहे.

द्वापार युगात श्री कृष्ण सूर्यग्रहणावेळी कुरुक्षेत्राच्या मूर्ती तलावामध्ये स्नान करण्यास आले होते. यावेळी, अक्रूर, वासुदेव, उग्रसेना, गाड, प्रद्युम्न, सामवा इ. यदुवंशी आणि स्त्रियासुद्धा श्रीकृष्णासोबत स्नान करण्यासाठी येथे आल्या होत्या.

Kurukshetra Tourism | Kurukshetra Tourist Places | Kurukshetra ...

त्याच वेळी ब्रजच्या गोप्यासुद्धा स्नान करण्यासाठी कुरुक्षेत्रात आल्या होत्या आणि या स्नानादरम्यान ते श्रीकृष्णाची आणि त्यांची भेट झाली. मग भगवान श्रीकृष्ण त्यांना रथात बसवून आणि स्वत: हा रथ चालवून सर्वांना मथुरेला घेऊन गेले होते.

अंग, मगध, वत्स, पांचाल, काशी आणि कौशलसह भारतातील विविध राज्यांचे अनेक राजे आणि सम्राटदेखील स्नान करण्यासाठी कुरुक्षेत्रात आले होते. त्याबरोबर असं म्हटलं जातं की सुर्यग्रहणाच्या निमित्ताने सन्निहित तलाव बांधण्यात आला होता. त्यानंतर तिथे सुर्यमंदिर बांधण्यात आलं. जेणेकरून भाविकांना स्नान केलं सूर्यदेवाचं की दर्शन घेता येईल.

Devotees could not bathe in the mythical lake due to Corona, Lord ...

आजचं सूर्यग्रहण सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून सुरु झालं होतं आणि ते 3 वाजून 3 मिनिटांनी ग्रहण संपलं.

खालील ग्रहण भारत, नेपाळ, पाकिस्तान, यूएई, इथोपिया आणि कांगो मध्ये दिसेल. भारतात हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. तर जयपुर, दिल्ली, चंडीगड, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, शिमला आणि लखनौ सारख्या शहरात काही प्रमाणात हे ग्रहण दिसणार आहे.

Solar Eclipse 2020 | देशाच्या वेगवेगळ्या भागात दिसलं सूर्यग्रहण, पाहा सूर्यग्रहणाची मनमोहक दृश्यं

Solar Eclipse 2020 | देशाच्या वेगवेगळ्या भागात दिसलं सूर्यग्रहण, पाहा सूर्यग्रहणाची मनमोहक दृश्यं

Comment here