कलाकारमनोरंजन

सुशांतच्या मृत्युनंतर 15 दिवसांनी त्याच्या वडिलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येने सर्वांना मोठा धक्का बसला. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतने मुंबईतील वांद्रा येथील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. कमी कालावधीत आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने इंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला आहे.

सुशांतच्या अभिनयातील साधेपणा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घ्यायचा. त्याने काम केलेल्या चित्रपटातील काही भूमिका अशा आहेत की आपण त्या कधीही विसरू शकत नाही. त्यापैकी सर्व प्रेक्षकांपर्यंत गेलेला चित्रपट म्हणजे एम, एस धोनी द-अनटोल्ड स्टोरी, या चित्रपटात सुशांतने धोनीची भूमिका एकदम यशस्वीपणे केली आणि खऱ्या धोनीचा 2011 विश्वचषकापर्यंतचा प्रवास त्याने चांगल्या प्रकारे पोहोचवला. अशा अनेक आठवणी आहेत ज्या की कायम आपल्याला सुशांतची आठवण करून देतील. त्यामुळे त्याच्या कुटूंबीयांनी एक निर्णय घेतला आहे.

Sushant Singh Rajput Family To Start Foundation In His Name To ...

दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा परिवार त्याला श्रद्धांजली देण्याकरीता एक फाउंडेशनची स्थापना करणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या आठवणी संभाळून ठेवण्यासाठी कुटुंबियांनी एक फाउंडेशन आणि स्मृती स्थळ बनवणार असल्याचं सांगितलं आहे. हे फाउंडेशन सुशांत सिंहच्या नावावर असेल आणि सुशांतचे बालपण ज्या घरांमध्ये गेले त्या ठिकाणी हे स्मृतिस्थळ बनवलं जाणार असल्याचं समजत आहे.

Sushant Singh Rajput Foundation

“सुशांत सिंह राजपूत फाउंडेशन” असेल. या फाऊंडेशनचे काम चित्रपट, खेळ आणि विज्ञान प्रतिभाशाली असणाऱ्या व्यक्तींनापुढे आणण्यासाठी मदत कार्य म्हणून असेल. हे तीन क्षेत्र सुशांतच्या आवडीचे होते. पटनामध्ये सुशांतचे बालपणीच्या घराला स्मृती स्थळांमध्ये बदललं जाणार असल्याचं सांगितलं आहे.

सुशांतला प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असायचे. त्यानी कुठल्याही बंधनाशिवाय स्वप्न पाहिलीत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतली. तो आमच्या कुटुंबियांचा अभिमान आणि प्रेरणा आहे. आज ही आम्हाला याचा विश्वास होत नाही आहे की त्याचे हास्य कधीच कानावर ऐकू येणार नाही. आम्ही त्याच्या चमकणाऱ्या नजरांना कधी पाहू शकणार नाही याचे प्रचंड दुःख आम्हा सर्वांना होत आहे.

Sushant Singh Rajput Family To Set Up SSR Foundation

 

दरम्यान, सुशांतचे सोशल माध्यमांवरील अकाउंट हे त्यांचे कुटूंबीय चालवणार असल्याचं त्यांच्या कुटूंबातील लोकांनी सांगितलं आहे. कारण सुशांतच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्याचे इंस्टाग्राम, ट्विटरचे अकाउंट चालवणार आहेत. जेणेकरून सुशांतच्या आठवणीही कायम जिवंत राहतील.

Comment here