आरोग्य

पोट व्यवस्थित साफ होत नाही मग करा हे घरगुती उपाय; जाणून घ्या!

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे योग्य  प्रकारे लक्ष देत नाही. कामाचा जास्त लोड, कमी पाणी पिणं आणि आहार योग्य वेळेवर न घेणं यामुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवतात. यामध्ये पोट साफ होत नाही ही तक्रार बऱ्याच जणांची असते. त्यामुळे यावर सारख्या सारख्या गोळ्या खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही मात्र यावर काही घरगुती उपाय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

Mide ağrısı için hangi bölüme/doktora gidilir? - Sağlık son dakika ...

पोट साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय- 

रात्री जेवणानंतर दुध घेऊन त्या दुधामध्ये एरंडेल तेल टाका आणि ते मिक्स करून प्या. सकाळी उठल्यावर तुमचं पोट पुर्ण साफ होऊ शकतं.

सकाळी उठल्या उठल्या चुळ भरून कोमट पाणी घेईन त्याच्यामध्ये दोन चमचे मध टाका आणि ते पाणी प्या. त्यानंतर तुम्हाला पोट हलकं हलकं झाल्यासारखं जाणवेल आणि पोट साफ होईल.

Problemas digestivos más frecuentes en España - Cardiavant

दूधात 2-3 अंजीर उकळून घ्यावेत आणि त्यानंतर  कोमट दूध आणि अंजीर खाल्ल्यानेही पोट पुर्णपणे व्यवस्थित साफ होण्यास मदत होते.

काही मनुके पाण्यात भिजवा. भिजवलेल्या मनुक्याचं पाणी प्या आणि सोबतच मनुका खाल्ल्याने तुमचं पोट पुर्ण साफ होऊ शकतं.

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक कोमट पाण्यात लिंबाचा रस, आल्याचा रस आणि दोन चमचे मध मिसळून ते मिश्रण प्यावं, असं केल्यानेही पोट साफ होण्यास मदत होते.

सकाळी होत नाही पोट साफ? तर चिंता करू ...

आपण आपलं आवडत जेवण असलं की ते जास्त खातो मात्र रोजच्या आहारापेक्षा आहार अतिप्रमाणात झाल्याने आपलं पोट बिघडतं आणि पोटात गॅस तयार होतो, अशावेळी मेथीचे दाणे हे काळ्या मीठासोबत खावेत.

पोट जड झालं असेल आणि डचकीप्रमाणे घाण ढेकर येत असतील तर अशावेळी खाण्याचा सोडा घेईन तो खावा. यानेही आपलं पोट पुर्णपणे साफ होतं.

भिजवलेली अळशी चाऊन खावी. सोबतच अळशीचं पाणीदेखील प्यायल्याने फायदा होतो.

आपल्या घरातील मसल्याच्या डब्यातील जिरं घेऊन ते भाजून त्याची पावडर करावी. भाजलेली पावडर ताकात टाकून ते ताक प्यावं.

दोन चमचे गुलकंद खावून त्यावर एक ग्लास दुध प्यावं. याने आपली पचनक्रिया मजबूत होते.

My Doctor Says I am Not Celiac, Can I Still Eat Wheat?

रात्रीच्या जेवणात मैदा, जंकफूडचा समावेश करणं टाळा. यामध्ये फायबर घटक नसल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here