आरोग्य

तुम्ही कधी विचारही केला नसेल इतके आरोग्यदायी फायदे आहेत मनुक्याचे ; जाणून घ्या सविस्तर!

वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरतं. त्यातील मनुके आपल्याला खूप फायद्याचे असतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात.

-मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

-डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

-दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.

मुनक्का और किशमिश में अंतर

-मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो

-झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खास करुन बद्धकोष्टावर हा उपाय करुन पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

-मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.

-मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मुनक्का का ये फायदा अब तक नहीं सुना ...

-दररोज मनुका खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स दूर होऊन केसगळतीची समस्याही दूर होते.

– मनुकांमधील अँटीऑक्सिंड्टसमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून वाचता येते. यातील गुणांमुळे सर्दी-खोकला बरा होऊ शकतो.

Comment here