कलाकार

खरंच संजय दत्तला चंबळच्या खऱ्याखुऱ्या डाकुंनी किडनॅप केलं होतं का?; संजयने केला खुलासा!

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची प्रतिमा नेहमीच गँगस्टर राहिली आहे. मग ती रील लाइफची असो वा वास्तविक जीवनाबद्दल. मात्र एकदा संजय दत्तचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी नक्की काय झालं होतं?, खरच संजयचं अपहरण झालं होत का?, हा प्रश्न अजूनही आहे. मात्र यावर खुद्द संजय दत्तने यावर खुलासा केला आहे.

1960च्या दशकातील हा किस्सा आहे. त्यावेळी संजय दत्तचे वडील अभिनेते सुनिल दत्त डाकूंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करत होते. त्या सिनेमाचं नाव होतं, मुझे जीने दो’.  सुनिल दत्त या चित्रपटाचे अभिनेते नव्हते तर ते या चित्रपटाचे प्रोड्यूसरही होते. सुनिल दत्त आणि त्यांची पत्नी नर्गिस यांनी मिळून अजंता आर्टस् या फिल्म कंपनीची स्थापना केली. त्यांच्यी कंपनीचा हा दुसरा चित्रपट होता.

Mujhe Jeene Do (1963) Superhit Bollywood Movie | मुझे जीने ...

सुनिल दत्त आणि नर्गिस दोघांचही सिनेमानर खूप प्रेम होतं. त्यांना असं वाटत होतं की भारतीय सिमेना सृष्टीत काहीतरी वेगळेपण यावं. त्यावेळी हॉलिवूड सिनेमामध्ये वेस्टर्न नावाचा जॉनर होता त्यांना हा जॉनर हिंदी चित्रपटांमध्ये आणायचा होता. वेस्टर्न  जॉनरमध्येघोडेस्वारी, बंदुका, फायटींग असायची आणि त्यावेळी हे सिनेमे चांगले हीट व्हायचे.

ICYMI: Sanjay Dutt's emotional message on Sunil Dutt's death ...

सुनिल दत्त यांना या चित्रपटात डाकुंची मानवी बाजू दाखवायचा प्रयत्न होता. सुनिल दत्त यांनी या चित्रपटाचं शुटींग चंगळमध्ये करण्याचं ठरवलं होतं. चंगळचं खोर म्हणजे भल्याभळ्यांची तिथे जायला तंतरायची. पण दत्त यांना चित्रपटात डाकूच्या जीवनशैलीला अनुसरून लोकेशन हवं होतं. सर्वांनी सुनिल दत्त यांनी समजुन सांगितलं तरी त्यांनी काही ऐकलं नाही. धाडस करून त्यांनी शुटींगचं सर्व युनिटसह सोबत नर्गिस आणि 3 वर्षांच्या संजयला सोबत नेलं होतं. शुटींग करताना त्यावळी पोलीस संरक्षण दिलं गेलं होतं.

संजय दत्त ने शेयर की पिता सुनील दत्त ...

चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्री वहिदा रहमान होत्या. त्यावेळच्या त्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या आणि अचानक चंबळमधील खतरनाक डाकू रूपासिंह सेटवर आला. परंतू त्यावेळी तो फक्त शुटींग पाहण्यासाठी आला होता. त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते आणि तेव्हा पोलीस बंदोबस्तही तैनात होता.

सुनिल दत्त यांनी डाकूची भूमिका साकारली होती. सुनिल दत्त यांची उंची, तगडी शरीरयष्टी, ऐटीत चालायची स्टाईल यामुळे तेहा खरेखुरे डाकू वाटत होते. डाकू रूपा रूपासिंह आणि सुनिल दत्त सेटवर गप्पा मारत होते आणि अचानक त्यावेळी संजय तिथे आला अन् सुनिल दत्त यांच्या मांडीवर बसला. रूपासिंहने सुनिल दत्त यांच्याशी बोलता बोलता संजयला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाला, ये सिनमा बनाने मे आपका कितना पैसा खर्च होता है?, यावर सुनिल दत्त म्हणाले दस पंधरा लाख. यानंतर लगेच डाकू रूपासिंह म्हणाला, अगर मै आपके इस बच्चे को किडनॅप करूं तो फिर मुझे कितना पैसा दोगे?, एकदम असं म्हटल्यावर सुनिल दत्त घाबरले पण त्यांनी तसं न दाखवता बोलता बोलता संजयला आपल्या मांडीवर घेतलं. सुनिल दत्त यांनी त्याच दिवशी नर्गिस आणि संजयला मुंबईला धाडलं, हा किस्सा संजयनेकपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला.

Birthday Special: Sunil Dutt And Sanjay Dutt Fight Story - 2 ...

दरम्यान, संजयच्या अपहरणाबद्दल असंही बोललं जातं की, ,त्यावेळी संजयचं अपहरण झालं होतं आणि सुनिल दत्त यांनी मोठी रक्कम दिली होती आणि आपलं राजकीय वजन वापरत संजयला सोडावलं होतं

Comment here